Friday, January 17, 2014

कधीतरी ...


कधीतरी ...

एकच शब्द पुन्हा-पुन्हा म्हणताना
तुझे उच्चार ठीक करताना
हे ही वाटतं -की तुझं बोबड बोलणं
शब्दांच्या लयात डोलनं
Miss करीन, कधीतरी

ऑफीस हून परत येताच
बूट काढायच्या ही आधी तुला घेताच
हे ही वाटतं -की जेव्हां "Hi Dad" म्हणून welcome करशील, माउ
तेव्हां दारा मागे लपून केलेला तुझा "भौ"
Miss करीन, कधीतरी

"ह्याच बाटलीचं पाणी प्यायचंय" "ह्याच खुचीर्त बसायचंय"
असे हट्ट िकतीही डोक्यात िशरले, तरीही
तू समजुत्दार होशील जेव्हां
तुझे हे िनरथर्क हट्ट तेव्हां
Miss करीन, कधीतरी

जेव्हां पुस्तक वाचता-वाचता स्वतः झोप
येईल आिण तुला जागं करायचा credit alarm घेईल
तेव्हां -झोप न आल्यावर पम्पम मधली लांब फेरी
घर येताच तू उठशील, हे माहीत असलं तरी
Miss करीन, कधीतरी


Wordsmith
(First Marathi post)